देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि लोकांच्या हाती दारिद्र्य - अशोक चव्हाण

  Pali Hill
  देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि लोकांच्या हाती दारिद्र्य - अशोक चव्हाण
  मुंबई  -  

  नरिमन पॉइंट - देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि लोकांच्या हाती दारिद्र्य अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. नरेंद्र मोदीं यांचा नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. विजा, मास्टर कार्ड यांसारख्या परदेशी कंपन्याना फायदा पोहचवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे की काय असा प्रश्नही त्यांनी या वेळी मोदी सरकारला विचारला. मुंबईत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

  भाजपा सरकारकडून नोटाबंदीमुळे दहशतवादाला आळा घातला जाईल असं सांगितलं होतं. दहशतवाद बंद झाला नाही. नोटाबंदीमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कित्येक कंपन्यानी नोकऱ्यांमध्ये कपाती केली आहे. 71 हजार कोटी रुपये कर्जमाफी उद्योगपतींना करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्याला पानं पुसली आहेत. भाजपाचे काही नेते नोटाबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्यामध्ये लागलेत. वैद्यनाथ बँकेचे पैसे खासगी गाडीमधून कसे काय नेऊ शकतात. असंही ते म्हणाले. तसंच निवडणूक आयोगाने जो रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली त्याचं अभिनंदनही त्यांनी या वेळी केलं. तसंच निवडणुकांमध्ये सत्ता आणि पैशाच्या जोरामुळे भाजपाला यश मिळालं. नोटाबंदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लागलेल्या आरोपांविरोधात 6 जानेवारीला देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव आणि 8 जानेवारीला घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. तसंच मुंबईमध्ये आघाडी करण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसला आहे आणि तो निर्णय पक्षश्रेष्ठी मान्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.