Advertisement

विधानसभेत शेतकरी कर्जमाफीवरून गदारोळ सुरुच


विधानसभेत शेतकरी कर्जमाफीवरून गदारोळ सुरुच
SHARES

मुंबई - बुधवारी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीसाठी होणारा गदारोळ शिवसेनेकडून थांबेल असे वाटत होते. मात्र तसे गुरुवारी विधिमंडळात झाले नाही. 

विधान सभेचे कामकाज सुरु झाल्यावर शेतकरी कर्जमाफी या विषयावरून गदारोळ होऊ लागला. अध्यक्षांच्या अनुमतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर निवेदन सुरु केले. यावेळी काँग्रेस व एनसीपीचे आमदार वेलमध्ये उतरून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते.

 मात्र 'विरोधी पक्ष शेतकरी कर्जमाफीवर राजकारण करत आहेत. विरोधी पक्ष सत्तेवर होता त्यामुळे आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल काय? तसेच कर्जमाफी दिल्यावर आत्महत्या होणार नाहीत याची विरोधी पक्षांचे नेते हमी देतील का'? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. 

साडे चार वर्षांत 16 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. भाजपा आणि शिवसेनेला शेतकरी कर्जमाफी मागण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले. मात्र यावेळी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपेपर्यंत शांत होते. जेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उभे राहिले तेव्हा शिवसेना आमदार वेलमध्ये घुसून शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करू लागले. विखे-पाटील यांच्या भाषणानंतर अजित पवार यांनाही शेतकरी कर्जमाफीसंदर्भात बोलायचे होते. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या घोषणाबाजीमुळे अजित पवार आपले म्हणणे मांडू शकले नाहीत. त्यानंतर शिवसेना आमदार अनिल कदम यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल शिवसेनेची भूमिका मांडली. आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा