वसतिगृहातील अन्नधान्यात भेसळ आढळल्यास आता ठेकेदारावर गुन्हा

  Mumbai
  वसतिगृहातील अन्नधान्यात भेसळ आढळल्यास आता ठेकेदारावर गुन्हा
  मुंबई  -  

  मुंबई - सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्यात भेसळ आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. चेंबूर येथील संत एकनाथ मुलांचे वसतिगृह येथे विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्याची घटना 22 फेब्रुवारी 2017 समोर आली होती. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी माहिती दिली की राज्यभरातील विविध वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून अशा स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे विविध सामाजिक संस्था, महिला बचत गटांना या वसतिगृहांना आहारपुरवठा करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसंच अशा वसतिगृहांना अन्नधान्याचा पुरवठा करताना त्यात भेसळ आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांवर ॲट्रॉसिटीनुसार कारवाई करण्याची मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. तर अशा प्रकारची कारवाई राज्य सरकार करणार असं आश्वासनही दिलीप कांबळे यांनी या वेळी दिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.