Advertisement

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक डिसेंबरमध्ये जनतेसाठी खुले होणार

ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मारक तयार करण्यासाठी ४०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक डिसेंबरमध्ये जनतेसाठी खुले होणार
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे दादरच्या शिवाजी पार्क येथील माजी महापौर बंगल्यातील बहुप्रतिक्षित स्मारक डिसेंबरमध्ये जनतेसाठी खुले केले जाईल. सुमारे 6,056.82 चौरस मीटर जमिनीवर तीन संरचनांचा समावेश असलेला हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. एकूण खर्च अंदाजे 180 कोटी आहे.

भव्य वास्तू किंवा पुतळ्यांऐवजी, पूर्वीच्या महापौरांच्या हेरिटेज बंगल्यापासून १५ मीटर अंतरावर ‘इंटरप्रिटेशन सेंटर’ नावाची वेगळी अधोरेखित रचना बांधली जाईल. यातून एका दिग्गज राजकारण्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे चित्रण होणार आहे.

ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मारक तयार करण्यासाठी ४०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. या निधीतून स्मारक तयार केले जाणार आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्मारकाच्या इमारतीचे बांधकाम होईल. यात बांधकाम, वीज यंत्रणेशी संबंधित कामं, मध्यवर्ती वातानूकुलित यंत्रणा, इमारतीच्या अंतर्बाह्य सजावटीचे काम, वाहनतळ, उद्यान, रेनवॉर हार्वेस्टिंग आदी कामं होणार आहेत. या कामांसाठी २५० कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.

स्मारक निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाशी संबंधित मोठी कामं होतील. यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग, डिजिटल यंत्रणेच्या मदतीने स्मारकात वेगवेगळ्या टप्प्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीची माहिती देणारी ऑडिओ-व्हिडीओ यंत्रणा उभारण्यात येईल. या कामासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.

एमएमआरडीए स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्मारकाच्या कामांवर लक्ष ठेवतील. उद्धव ठाकरे यांच्या देखरेखीत स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे. स्मारक तयार झाल्यानंतर 'बाळासाहेब ठाकरे मेमोरियल ट्रस्ट' दैनंदिन देखभाल आणि व्यवस्थापनाचे काम बघणार आहे. या स्मारकाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत.

एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्यासाठी ४०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून उत्तम असे स्मारक तयार केले जाणार आहे. हे स्मारक बघण्याच्या निमित्ताने मुंबईतील पर्यटनाला चालना मिळेल.



हेही वाचा

Uddhav Thackeray Interview: “…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे संतापले">Uddhav Thackeray Interview: “…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे संतापले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा