मुंबई - मुलुंडला पैसे बदलण्याच्या रांगेत उभ्या राहिलेल्या 73 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला. तरीही बँकांसमोर उभ्या राहणाऱ्यांच्या रांगेवर काहीच परिणाम झालेला नाही. अखेर, जनतेचे प्रतिनिधी असलेले नेते मैदानात उतरलेत. जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन नेत्यांकडून केलं जातंय.