'बंडोबां'च्या संख्येत वाढ


  • 'बंडोबां'च्या संख्येत वाढ
SHARE

घाटकोपर - पालिका निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार बड्या पक्षात होते. पण तिकीट न मिळाल्यामुळे आता अपक्ष म्हणून हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. इतकंच नाही तर विजयी होण्याचा विश्वास देखील या सर्व उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

यात प्रभाग 123 मधील भाजपाच्या हर्षदा कोदे, शिवसेनेतील स्नेहल मोरे, प्रभाग 124 मधून मनसेच्या संजना जाधव, प्रभाग 127 मधून मनसेचे शरद भावे, प्रभाग 130 मधून शिनसेनेच्या कविता फर्नांडिस, प्रभाग 129 मधून भाजपाचे चंद्रकांत माळी, मनसेचे राजेश मोरे या सर्व उमेदवारांना पक्षातून तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे आता हे सर्व उमेदवार बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या