Advertisement

देशात अघोषित आणीबाणी : प्रकाश आंबेडकर

साहित्यक, कलावंत, राजकारणी आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असल्यामुळे देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचे पावलोपावली पहायला मिळत आहे. सत्तेत असलेले केंद्र सरकार या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे.साहित्यक, कलावंत, राजकारणी आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असल्यामुळे देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचे पावलोपावली पहायला मिळत आहे. सत्तेत असलेले केंद्र सरकार या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे.

देशात अघोषित आणीबाणी : प्रकाश आंबेडकर
SHARES

साहित्यक, कलावंत, राजकारणी आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असल्यामुळे देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं पावलोपावली पहायला मिळत आहे. सत्तेत असलेलं केंद्र सरकार या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे. देशातील जागृक नागरिकांनी याची दखल घ्यावी, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केलं.


पालेकरांना मिळालेल्या वागणूकीचा निषेध

ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना पालेकर यांचे भाषण आयोजकांनी थांबवलं. मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमधली हा प्रकार घडला.  कार्यक्रमाचा विषय सोडून सरकारच्या काही निर्णयांवर टीका करून पालेकर यांनी औचित्यभंग केल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. पालेकरांना मिळालेल्या या वागणुकीबद्दल आयोजकांवर सर्वच स्तरावरून टिका करण्यात आली. त्यासंदर्भात पालेकर यांनी ही रविवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. पालेकरांना मिळालेल्या वागणूकीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टिका करत घडलेल्या प्रकाराचा निषेध केला. 


विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय

आज देशभरात सरकार विरोधातला आवाज दाबला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपानं जे केले तोही याचाच भाग होता. कार्यक्रमासाठी कोर्टातून सहजपणे परवानगी मिळत होती. पण तसं न करता भाजपनं आपली हुकूमशाही वृत्ती आणि मनमानीपणा दाखवत पश्चिम बंगालमध्ये गोंधळ निर्माण केला. अमोल पालेकर हे  कला आणि सांस्कृतिक धोरणाच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना देखील रोखलं गेलं, ही कृतीसुद्धा हुकूमशाही वृत्ती असल्याचं आंबेडकर म्हणाले. 


संविधान चौकटीत आणण्याच्या मुद्यावर ठाम

राज्यातील आघाडीसंदर्भात आंबेडकर म्हणाले, काँग्रेस जोपर्यंत संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा देत नाही, तोपर्यंत आघाडीसाठीची चर्चा पुढे जात नाही. ज्या जागांवर त्यांचे उमेदवार नाहीत आणि ज्या जागा मागील ३ निवडणुकांत ते हरलेले आहेत, अशा जागा मागतोय. तरीही काँग्रेस संघाच्या अजेंड्यावर काही बोलत नाही त्यामुळे आम्ही हाच अजेंडा निवडणुका झाल्यावरसुद्धा राखू शकतो, असं मत आंबेडकर यांनी मांडलं.



हेही वाचा

एकत्रित निवडणूकांसाठी मुख्यमंत्री राज्यमंत्रीमंडळ बरखस्त करतील : अशोक चव्हाण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा