Advertisement

‘वीर सावरकर कितने वीर?’ पुस्तकावर बंदी घालण्याची आशिष शेलार यांची मागणी

या पुस्तकात सावरकरांची बदनामी करणारा मजकूर छापण्यात आल्याने महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

‘वीर सावरकर कितने वीर?’ पुस्तकावर बंदी घालण्याची आशिष शेलार यांची मागणी
SHARES

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात वीर सावरकरांच्या संदर्भातील पुस्तकांचं वाटप करण्यात आलं होतं. या पुस्तकात सावरकरांची बदनामी करणारा मजकूर छापण्यात आल्याने महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

भोपाळमध्ये सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसाठी १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ‘वीर सावरकर कितने वीर’ नावाचं पुस्तक वाटण्यात आलं. या पुस्तकार सावरकरांनी अंदमान येथील तुरूंगातून सुटल्यानंतर ब्रिटीशांकडून पैसे घेतले होते. सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते, अशा स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे. या पुस्तकाची माहिती मिळताच काँग्रेसचा आदर्श जिन्ना असल्यानेच ते सावरकरांवर टीका करत असल्याचं म्हणत भाजपकडून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे.  


हेही वाचा- सावरकरांचे गायींबद्दलचे विचार तुम्हाला मान्य आहेत का? ठाकरेंचा भाजपला थेट प्रश्न

यासंदर्भात ट्विट करून भाजप नेते आशिष शेलार यांनी तुमच्या महाराष्ट्र धर्माच्या पालनात सावरकर येत असतील तर या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही या पुस्तकावर तीव्र आक्षेप घेत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करतानाच संबंधितांवर भादंवि कलम १२०, ५००, ५०३, ५०४, ५०५ आणि ५०६ अन्वये  गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा- केंद्रात तुमचंच सरकार, सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कुणी रोखलंय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा