Advertisement

मुंबईत मराठा आरक्षणासाठी दुचाकी फेरी

मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि शिवसंग्राम यांच्यातर्फे रविवारी मुंबईत दुचाकी फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबईत मराठा आरक्षणासाठी दुचाकी फेरी
SHARES

मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि शिवसंग्राम यांच्यातर्फे रविवारी मुंबईत दुचाकी फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाले असून सरकारचा वेळकाढूपणा सुरू आहे. हे असेच सुरू राहिले, तर आंदोलनाचे वणव्यात रूपांतर होईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आंदोलकांनी सरकारला दिला आहे.

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विविध संघटनांनी विद्याविहार येथील सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी दुचाकी फेरी काढून रविवारी आंदोलन केले. पाऊस असूनही मुंबईतील विविध भागांमधून आंदोलक मोठ्या प्रमाणावर या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते.

विरोधी पक्षनेते दरेकर, आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर आंदोलनात सहभागी झाले होते. शिवाय मुंबईचा डबेवाले देखील या आरक्षणासाठी आपल्या सायकलवरून रॅलीत सहभागी झाला होता.

'ज्याप्रमाणे आरक्षणाबद्दल दिरंगाई सुरु आहे, ती अक्षम्य आहे. राज्य सरकारचं आरक्षणाबाबत अजूनही मत बनलेलं नाही. या दिरंगाईचा परिणाम समाजाच्या संयमाला नख लागेल असा होऊ नये ही आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. मुख्यमंत्री साहेब, भाषणं सोडा, कृती दाखवा' असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. 'मराठा समाजाचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता ह्या आंदोलनांच्या माध्यमातून हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे. ठाकरे सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली आहेत. फडणवीस सरकारने केलेल्या तरतुदी तरी तात्काळ पुन्हा द्याव्यात अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे' असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.



हेही वाचा -

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शवटची तारीख

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा