Advertisement

भाजपच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण

भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण
SHARES

भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत (bjp bhiwandi mp kapil patil tested covid 19 positive) आहे. कपिल पाटील यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील एकूण ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. कपिल पाटील यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा कोरोनाने पिच्छा पुरवल्यानंतर आता विरोधी पक्षातील नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत.

खासदार कपिल पाटील हे हायवे दिवे येथील निवासस्थानी एकत्र कुटुंबात राहता. कपिल पाटील यांच्या पत्नीला सगळ्यात पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर कपिल पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर घरातील इतर व्यक्तींचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत एकमेकांच्या संपर्कात आल्याने स्वत: कपिल पाटील, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, पुतण्या व दोन सूना असे एकूण ८ जण करोनाबाधित आढळून आले. 

हेही वाचा - ठाण्यात ३१ ते ५० वयोगटात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

या सर्वांवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची प्रकृर्ती ठीक असून काळजीचं कारण नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. कपिल पाटील कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे अडचणी आलेल्यांची मदत करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असंही म्हटलं जात आहे.  

दरम्यान याआधी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही काेरोनाची लागण झाली होती.

 हेही वाचा - नवी मुंबईत अनलाॅकनंतर कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदरात मोठी वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा