Advertisement

भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन भरणार उमेदवारी अर्ज

उत्तर मध्य मुंबईच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन भरणार उमेदवारी अर्ज
SHARES

उत्तर मध्य मुंबईच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पूनम महाजन राजकारणात उतरल्या. त्यानंतर काही वर्ष पक्षाच्या संघटनेसाठी काम केल्यावर २०१० मध्ये भाजपनं भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली.


प्रिया दत्त विरुद्ध पूनम महाजन

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी पूनम महाजन यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसनं प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली आहे. प्रिया दत्त या २००९ ते २०१४ पर्यंत खासदार राहिल्या आहेत. त्याशिवाय, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांना पूनम महाजन यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, प्रिया दत्त यांनी सुरूवातील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला होता. मात्र, काही दिवसांनी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी होकार दिली होता.


मातोश्रीवर भेट

काही दिवसांपूर्वी उत्तर मध्य मुंबईमध्ये निवडणूक प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पूनम महाजन यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली



हेही वाचा -

निवडणूक आयोगाविरोधात विधान केल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

आता रेमंड रिअल इस्टेट क्षेत्रात उतरणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा