Advertisement

'हा' निवडणूक आयोगाचा विजय- राऊत

पहिल्या पंधरा फेऱ्यांमध्येच भाजपाचा विजय जवळजवळ निश्चित झाला नि २० फेऱ्यानंतर भाजपानं पालघरमध्ये एकच जल्लोष सुरू केला. गावित यांच्यासह भाजपाचे प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण यासारख्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी करत सेलिब्रेशनला सुरूवात केली.

'हा' निवडणूक आयोगाचा विजय- राऊत
SHARES

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली नि पहिल्या फेरीपासून भाजपाच्या राजेंद्र गावितांनी आघाडी घेतली. ही आघाडी गावितांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत तब्बल २९ हजार ७७२ हजार मतांनी विजय मिळवत शिवसेनेला धूळ चारली. पहिल्या पंधरा फेऱ्यांमध्येच भाजपाचा विजय जवळजवळ निश्चित झाला नि २० फेऱ्यानंतर भाजपानं पालघरमध्ये एकच जल्लोष सुरू केला. गावित यांच्यासह भाजपाचे प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण यासारख्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी करत सेलिब्रेशनला सुरूवात केली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, फटाके वाजवत विजयोत्सव सुरू केला आणि दीडच्या सुमारास विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढतंच गेला.


भाजपाच्या विजयाचा पालघरमध्ये जल्लोष सुरू असला तरी मुंबईत मात्र विजयोत्सव साजरा करणं भाजपानं टाळलं. भाजपाचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे भाजपानं मुंबईत विजयोत्सव साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं.


विजयानंतर शिवसेनेवर वार

गावित यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना पालघरच्या मतदारांचे आभार मानले. पण त्याचवेळी विजयानंतर पहिला वार केला तो प्रतिस्पर्धी शिवसेनेवर. सत्तेत राहून नकारात्मकता पसरवणार्यांना पालघरच्या मतदारांनी धडा शिकवल्याचं म्हणत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. तर चार वर्षाच्या अनुभवाचा पक्षाला फायदा झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाला प्राधान्य दिलं आणि याच विकासाच्या जोरावर मतदारांनी विजयी केल्याचं म्हणत जनतेचे विशेष आभार मानले.


हा निवडणूक आयोगाचा विजय

भाजपाचा विजय निश्चित झाल्याबरोबर सेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली ती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची. हा विजय भाजपाचा नसून तो निवडणूक आयोगाचं आहे असं म्हणत निवडणूक आयोगावर सुरूवातीपासूनच तिखट प्रतिक्रिया देणार्या राऊतांनी पुन्हा निवडणूक आयोगालाच घेरण्याचा प्रयत्न केला. पालघरमध्ये आम्ही आमची ताकद दाखवली. आम्हाला मतदारांनी जे भरभरून मत दिली त्यातून आमची ताकदही दिसून आली. तर ही ताकद २०१९ च्या निवडणुकांची तयारी असून भाजपाची घंटा वाजवणार असंही राऊत म्हणाले.


देना पार्टी नही लेना पार्टी है-हितेंद्र ठाकूर

२००९ मध्ये पालघर लोकसभा ज्या पक्षाच्या ताब्यात होती त्या बहुजन विकास आघाडीला पोटनिवडणुकीत तिसर्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. २०१४ च्या निवडणुकीत याच बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांनी २ लाख ९३ हजार ६८१ मत मिळवत भाजपाचे विजयी उमेदवार चिंतामण वानगाला तगडी टक्कर दिली होती.

२०१४ मधील उमेदवार असलेल्या बळीराम जाधव यांनाच पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं उमेदवारी दिली होती. पण मतविभाजनाचा चांगलाच फटका बहुजन विकास आघाडीलाही बसला नि भाजपानं बाजी मारली. भाजपाच्या विजयानंतर दिलेल्या बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांनी भाजपा, सेनेवर टीका करण्याआधी थेट काँग्रेसवर टीकेची झोड उडवली. काँग्रेसनं जर साथ दिली असती तर चित्र वेगळं असतं असं म्हणत ठाकुर यांनी काँग्रेसही देना पार्टी नव्हे तर लेना पार्टी असल्याचं म्हटलं आहे.



हेही वाचा-

पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates: साठी इथं क्लिक करा


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा