Advertisement

युतीसाठी अमित शाहकडून उद्धव ठाकरेंना फोनवरून गळ

भाजपा-शिवसेना युतीसाठी अखेर भाजपानं पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. युतीसाठी भाजपाकडून सातत्यानं शिवसेनेला गळ घालण्याचा प्रयत्न भाजपाच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेत्यांकडूनही प्रयत्न होत आहे. पण तरीही शिवसेना कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळेच आता केंद्रातील भाजपाच्या नेत्यांनी, स्वत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

युतीसाठी अमित शाहकडून उद्धव ठाकरेंना फोनवरून गळ
SHARES

भाजपा-शिवसेना युतीसाठी अखेर भाजपानं पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. युतीसाठी भाजपाकडून सातत्यानं शिवसेनेला गळ घालण्याचा प्रयत्न भाजपाच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेत्यांकडूनही प्रयत्न होत आहे. पण तरीही शिवसेना कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळेच आता केंद्रातील भाजपाच्या नेत्यांनी, स्वत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमित शाह यांनी बुधवारी स्वत पुढाकार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून गळ घातली आहे. 


युतीबाबती शिवसेनेची संदिग्ध भूमिका

शिवसेनेकडून स्वबळाचीच भाषा केली जात असली तरी शिवसेना नेत्यांच्या वक्तव्यांमधून युतीबाबतची शिवसेनेची संदिग्ध भूमिका सातत्यानं समोर येत आहे. तर भाजपा मात्र युतीसाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपाकडून सातत्यानं युतीसाठी प्रयत्न होत आहेत. तर शिवसेना मात्र भाजपावर दबाव टाकत आपणच महाराष्ट्रातील मोठा भाऊ असल्याचं ठासून सांगताना दिसत आहे. असं असलं तरी या दोन्ही पक्षांना युतीची गरज असल्याचं म्हटलं जात असल्यानं युतीची चर्चा काही पूर्णविराम घेताना दिसत नाही.


युतीबाबत लवकर निर्णय घ्या

अशातच आता निवडणुका तोंडावर आल्यानं शक्य तितक्या लवकर युतीचा प्रश्न निकाली काढणं गरजेचं आहे. म्हणूनच आता अमित शाह यांनी पुढाकार घेत उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. हिंदुत्वासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, त्यामुळे युतीबाबत लवकर निर्णय घ्या अशा शब्दात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना गळ घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर नेमकी काय भूमिका घेत याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे. 



हेही वाचा -

हात हालवत आले, हात हलवत गेले- प्रकाश आंबेडकर

पेंग्विननंतर आता राणीबागेत ३ डी थिएटर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा