Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

अनिल परबांची बाजू तर पक्षप्रमुखही घेत नाहीत- भाजप

ज्या व्यक्तीची बाजू पक्षप्रमुखही घेत नाहीत अशा व्यक्तीने तर स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपकडून (bjp) होत आहे.

अनिल परबांची बाजू तर पक्षप्रमुखही घेत नाहीत- भाजप
SHARES

सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस सहायक निरिक्षक सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रावरून भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केलं जात आहे. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीची बाजू पक्षप्रमुखही घेत नाहीत अशा व्यक्तीने तर स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपकडून (bjp) होत आहे.

अनिल देशमुखांवर १०० कोटीचे आरोप झाले तेव्हा शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांची पाठराखण केली. मग अनिल परबांवर आरोप झाले तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का आहेत? ज्या व्यक्तीची बाजू पक्षप्रमुखही घेत नाहीत अशा व्यक्तीने तर स्वतःहून राजीनामा द्यावा!, अशी टीका करत भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

सचिन वाझे यांनी ‘एनआयएल’ पत्र लिहून सेवेतील नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महापालिकेशी संलग्न असलेल्या ५० कंत्राटदाराकडून प्रत्येकी २ कोटी रुपये खंडणी गोळा करण्यास सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे. 

हेही वाचा- अनिल देशमुखांनी पवारांच्या मनधरणीसाठी मागितली खंडणी, आता सचिन वाझेंचा ‘लेटरबाॅम्ब’

त्यावर अनिल परब  (anil parab)यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे यांनी पत्रातून केलेले हे आरोप फेटाळून लावले. माझं दैवत हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे कारस्थान आहे. एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून मी ५० लाख रुपये मागितले आणि जानेवारी २०२१ मध्ये मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या, असे दोन आरोप सचिन वाझे यांनी माझ्यावर केले आहेत.

जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितल्याचं जर ते म्हणत असतील, तर इतके दिवस ते गप्प का होते. परमबीर सिंग यांच्याही पत्रात याचा कुठेही उल्लेख नाही. कारण या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असा स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं.

तसंच भाजपचे नेते दोन-तीन दिवस आरडाओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण त्यांना आधीपासून माहिती होतं. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. एनआयए, सीबीआय, रॉ, नार्काेटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे, असं आव्हानही अनिल परब यांनी दिलं.

(bjp demands resignation of shiv sena minister anil parab in extortion case)

 हेही वाचा- “खंडणी वसूल करणाऱ्या सरकारला मेहनती दुकानदारांचे हाल कसे कळणार?”


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा