Advertisement

मुख्यमंत्री आता तुमच्या घरी


SHARES

मुंबई - महापालिका निवडणूक जवळ आली आणि प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागले. याच निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने मात्र एक नवीन शक्कल लढवलीय. प्रचारासाठी भाजपा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. प्रचारासाठी INVITE CM हे एक अॅप लाँच करण्यात आलं आहे. फिल्म निर्देशक मणी शंकर आणि अवंतरी कंपनीने हे अॅप तयार केलं आहे. या अॅपमुळे मुख्यमंत्री खुद्द तुमच्या घरी अवतरणार आहेत.

हे अॅप प्ले-स्टोरमधून डाऊनलोड केल्यानंतर मार्करने मार्क केलेल्या एका साध्या कागदावर धरून अॅपमधील कॅमेरा धरायचा. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची थ्रीडी होलोग्राम प्रतिमा दिसते आणि चार मिनिटांचं भाषण सुरु होतं. यासाठी इंटरनेटचीही गरज लागणार नाही. हे थ्री डी होलोग्राम लाईफ साईझ आकाराचं असल्याने कोणीही मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढू शकतो.

फिल्म निर्देशक मणी शंकर यांच्या डोक्यातून ही संकल्पना आली. मणी शंकर यांनी 2012 साली नरेंद्र मोदी यांचं 55 मिनिटांचं भाषण गुजरातमधील 23 शहरात 53 ठिकाणी एकाच वेळी सुरू केलं होतं. याबद्दल मणी शंकर आणि नरेंद्र मोदी यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे. हे अॅप आणि देवेंद्र फडणवीस यांचं भाषण तीन भाषेत उपलब्ध आहे. या नवीन अॅपमुळे भाजपाला मुंबई आणि इतर शहरांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फायदा होईल असा विश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा