Advertisement

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा - आशिष शेलार

कोस्टल रोड प्रकल्प हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा - आशिष शेलार
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते आशिश शेलार यांनी केला आहे. 

सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीनं अधिक रक्कम देण्यात आली आहे. कॅगनंही त्यावर ताशेरे ओढले आहेत, पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.

मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, महापालिकेनं कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे. ६ सप्टेंबर २०२१ आणि २ ऑक्टोबर २०२१ रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचं मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे.

प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या कन्सल्टंटला कुठे ना कुठे बेकायदेशीर मदत केली जात आहे. त्यांना जास्तीचा पैसा दिला जात आहे. वेगवेगळ्या पॅकेजमधील तीन कंत्राटदार आहेत. त्यांना अवास्तव बिलं दिली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मी जेव्हा आरोप केले होते. तेव्हा पालिकेनं असं काही नसल्याचं म्हटलं होतं. तसं लिखीत उत्तर पालिकेनं दिलं होतं. माझ्याकडे पुरावे आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

कॅगनं कोस्टल रोडवर काय ताशेरे ओढले त्यावरही शेलार यांनी भाष्य केलं. कोस्टल रोडचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा असल्याचं कॅगनं म्हटलं आहे. डीपीआर करताना जे ट्रॅफिकचं अचूक विश्लेषण केलं जातं. यात वाहतुकीचं अॅनालिसिस केलं गेलं नाही, असं कॅगनं म्हटलं आहे, असं शेलार यांनी सांगितलं.हेही वाचा

वरळी सिलिंडर स्फोट : आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा - नितेश राणे

भाजप नेते आशिष शेलारांची महापौरांवर टीका; राज्य महिला आयोगानं मागवला अहवाल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा