Advertisement

“संजय राऊत या शैक्षणिक जगबुडीपासून तुम्हीच वाचवा”- आशिष शेलार

परीक्षांच्या मुद्द्यावरून सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे "ग्रहण" काही सुटत नाही, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिक्षणमंत्र्यांना टोला हाणला आहे.

“संजय राऊत या शैक्षणिक जगबुडीपासून तुम्हीच वाचवा”- आशिष शेलार
SHARES

व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. परीक्षा द्यायची किंवा नाही असे दोन पर्याय सरकारने विद्यार्थ्यांपुढे ठेवले आहेत. तर अजूनही एटीकेटी/बॅकलाॅकच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. या परीक्षांच्या (bjp leader ashish shelar criticised higher and technical minister uday samant over cancellation of final year exam) मुद्द्यावरून सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे "ग्रहण" काही सुटत नाही, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिक्षणमंत्र्यांना टोला हाणला आहे.

उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधत सरकारच्या निर्णयाची माहिती विद्यार्थ्यांना दिली होती. यासंदर्भात ते म्हणाले की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अव्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला. परंतु यासंदर्भातील घोषणा झाल्यावर सरकारच्या निर्णयावर काहीजणांकडून टीका झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी देखील याबाबत एक पत्र पाठवल्याने विद्यार्थी-पालकांच्या मनातील गोंधळ वाढला. परंतु राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

हेही वाचा - BA, Bsc आणि Bcom च्या परीक्षा होणार नाहीच- उदय सामंत

या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बीए, बीएएसस्सी आणि बीकॉम या अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्रातील परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवं असल्यास, त्यांनी तसं लेखी स्वरुपात लिहून दिल्यास सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनीही विद्यापीठाला लेखी लिहून द्यायचं आहे. विद्यापीठाकडून या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांची ऐच्छीक परीक्षा घेण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असल्या तरी, या अभ्यासक्रमांच्या शिखर संस्था केंद्रात असल्याने त्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक राहील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.  

त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, सूर्याचं ग्रहण सुटलं पण विद्यार्थ्यांचे "ग्रहण" काही सुटत नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अहंकाराचे "कंकण" काही तुटत नाही. त्यामुळे ATKT सह तमाम विद्यार्थी मित्र हो!

चला आता "सरकारचे संकटमोचन" संजय राऊत यांचा धावा करु या! या"शैक्षणिक जगबुडी" पासून तुम्हीच वाचवा! अशी विनंती शेलार यांनी राऊतांना केली आहे.

हेही वाचा - सरकारचे संकटमोचन, आता तुम्हीच धावून या, आशिष शेलारांची चक्क राऊतांना हाक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा