Advertisement

‘ही’ तर ठाकरे सरकारची नाचक्की- चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात आलेलं अपयश म्हणजे ठाकरे सरकारची नाचक्की असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

‘ही’ तर ठाकरे सरकारची नाचक्की- चंद्रकांत पाटील
SHARES

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात आलेलं अपयश म्हणजे ठाकरे सरकारची नाचक्की असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. 

मराठा आरक्षणावरील स्थगितीसंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर बाजू मांडताना नवे मुद्दे लक्षात आणून द्यायचे असतात. परंतु बुधवारी झालेल्या सुनावणीत मुकुल रोहतगी यांनी कोणतेही नवे मुद्दे मांडले नाहीत. मागच्या वेळचे मुद्देच पुन्हा पुन्हा मांडण्यात आले. 

या सुनावणीसंदर्भात सरकारने कुठलीही पूर्वतयारी केल्याचं दिसून आलं नाही. म्हणूनच मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. तोपर्यंत मराठा समाजातील मुलांपुढे अंधार निर्माण झाला आहे. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात आलेलं हे अपयश म्हणजे ठाकरे सरकारची नाचक्की असल्याचं, चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. 

हेही वाचा- मराठा आरक्षण: तोपर्यंत सरकार काय करणार? संभाजीराजेंचा सवाल

याआधी मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे समाजातील मुलांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. शिक्षण तसंच नोकरीतील आरक्षावर स्थगिती आल्याने गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे. सरकारी भरती, महाविद्यालयातील प्रवेश रखडले आहेत. परिणामी पुढं नेमकं काय करायचं हे त्यांना सुचेनासं झालं आहे. या मुलांना कशा रितीने मदत करता येईल, यासंबंधी राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली.  

राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि इतर वकिलांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली. परंतु बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली? पुढची तयारी करण्यासाठी की दुसऱ्या कुठल्या विषयासाठी? हे मला कळालं नाही. ही सुनावणी पुढे किती दिवस चालणार माहिती नाही. तरीही २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, अशी अपेक्षा वाटत आहे. तोपर्यंत मराठी समाजातील मुलांसाठी सरकार काय करणार आहे, त्यांना काय मदत देणार आहे? हे सरकारने स्पष्ट करावं, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

(bjp leader chandrakant patil reacts on maratha reservation hearing in supreme court)

हेही वाचा- ठाकरे सरकारला मोठा दणका, मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा