Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

नाशिक दुर्घटना: देवेंद्र फडणवीसांनी केली सखोल चौकशीची मागणी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तसंच या घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली.

नाशिक दुर्घटना: देवेंद्र फडणवीसांनी केली सखोल चौकशीची मागणी
SHARES

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आॅक्सिजन टाकीला झालेल्या गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तसंच या घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली. 

वृत्तसंस्थेशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. प्रशासनाने आता गरजूंना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याचं काम केलं पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- ‘त्यांचे’ अश्रू कसे पुसू?, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीत बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास टँकरमधून आॅक्सिजन भरण्यात येत असताना ही गळती सुरू झाली. यावेळी रुग्णालयात जवळपास १३१ रुग्ण उपचार घेत होते. आॅक्सिजन गळतीमुळे दाब कमी होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. तर ३ ते ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच ६ ते ७ रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आल्याचंही समजत आहे.

या घटनेवर शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे.

तसंच कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. कोरोनाशी विषम प्रकारची लढाई सुरू आहे. कुठं प्राणवायू नाही, कुठं औषधं नाहीत, कुठं बेड नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिकची ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचं राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. 

(bjp leader devendra fadnavis reaction on nashik hospital oxygen leak incident)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा