Advertisement

मुख्यमंत्र्यांविरोधात किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
SHARES

उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरूद्ध भाजप (bjp) असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबाग मध्ये असलेली ५ कोटी रूपयांची संपत्ती माहीत असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नाही. मी स्वत: या प्रकरणाचा जाऊन तपास केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी बलदेवसिंग यांच्याकडे भाजपने तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून आपली ही संपत्ती लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे तसंच बलदेवसिंग यांनी आमची तक्रार दिल्लीत निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचं आश्वासन दिल्याचं किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

हेही वाचा- राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती; हा पैसा आला कुठून?- किरीट सोमय्या

त्याचसोबत उद्धव ठाकरेंचे १९ बंगले, प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जमीन ईडीच्या ताब्यात, संजय राऊत- प्रवीण राऊत यांचे पार्टनर महाकाली मंदिर/गुंफाची जमीन बिल्डरला, बीएमसीने दहिसरमधील २.५५ कोटी रुपयांच्या जागेचे बिल्डरला ३४९ कोटी रुपये दिले. ५००० खाटांचा १२,००० कोटींचा कोविड हाॅस्पिटल घोटाळा, आणखी किती पुरावे हवेत, असं ट्विट करत अनेक प्रश्न देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

किरीट सोमय्यांकडून सातत्याने ठाकरे कुटुंब आणि शिवसेना (shiv sena) नेत्यांना आर्थिक घोटाळ्याच्या नावाखाली टार्गेट करण्यात येत आहे. 

याआधी संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मार्गाने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा', अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.

या आरोपांना उत्तर देताना, ही मंडळी बेफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते आणि माझ्या कुटुंबासोबत तेच केलं. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला होता.

(bjp leader kirit somaiya register a complaint against maharashtra cm uddhav thackeray in election commission)

हेही वाचा- कितीही फडफड केली तरी.., संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा