Advertisement

ठाण्यातील शिवसेना नेते, मंत्र्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले- निलेश राणे

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत, असा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला.

ठाण्यातील शिवसेना नेते, मंत्र्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले- निलेश राणे
SHARES

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत, असा दावा भाजप नेते निलेश राणे (bjp leader nilesh rane) यांनी केला. 

शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं घर आणि कार्यालयाच्या ठिकाणी ईडीने छापे टाकून सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतलं. यावरून सकाळपासूनच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

हेही वाचा- एक महिला घरी नसताना केलेल्या कारवाईत कोणती मर्दानगी होती?- प्रवीण दरेकर

यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणे म्हणाले, ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती आहे. ठाणे महापालिका हे भ्रष्टाचाराचं विद्यापीठ आहे. ठाणे जिल्हा आणि शहरात बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार चालतात. ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार ठाण्यात करतात, त्यावरून भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे, हे ठाणेकरांना चांगलं माहीत आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्यातील शिवसेनेचे (shiv sena) आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केला.

ईडी ही एक सरकारी संस्था आहे. कोणाला काय वाटतं म्हणून सरकारी संस्था काम करत नाही, तर त्यांना काहीतरी माहिती मिळाली असेल, तक्रार आली असेल म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या नसतील, तर त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही, असं देखील निलेश राणे म्हणाले.

तर बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.

(bjp leader nilesh rane corruption allegations on shiv sena mla and leaders)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा