Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

एक महिला घरी नसताना केलेल्या कारवाईत कोणती मर्दानगी?- प्रवीण दरेकर

प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई राजकीय आकसातून केल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात असताना ईडीच्या कारवाईचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.

एक महिला घरी नसताना केलेल्या कारवाईत कोणती मर्दानगी?- प्रवीण दरेकर
SHARES

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं मुंबई-ठाण्यातील घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे टाकले. ईडीने केलेली ही कारवाई राजकीय आकसातून केल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात असताना ईडीच्या कारवाईचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. शिवाय एक महिला घरी नसताना केलेल्या कारवाईत कोणती मर्दानगी होती? असा पलटवार देखील केला. 

ईडीच्या कारवाईमुळे संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बरेच आरोप केले. प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही काळात अर्णब गोस्वामी, कंगना राणौत आणि अन्वय नाईक ही प्रकरणं लावून धरली. त्या आकसातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. ईडी ही एका पक्षाची राजकीय शाखा असल्याप्रमाणं काम करते आहे. ज्यांचे आदेश ईडी पाळत आहे, त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी त्यांच्याकडं पाठवून देतो. करा कारवाई, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

हेही वाचा- ‘त्या’ आकसातूनच प्रताप सरनाईकांवर कारवाई- संजय राऊत

ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकण्यात आली. ही नामर्दानगी आहे. आमच्या प्रत्येक आमदाराच्या, खासदाराच्या आणि नेत्याच्या घरांसमोर ईडीनं कार्यालय थाटलं तरी आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

या आरोपांवर एका वृत्त वाहिनीशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, यात कसली मर्दानगी",असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना...सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?

ईडीसारख्या तपास यंत्रणेवर चिखलफेक करणं उचित नाही. माध्यमं आणि विरोधी मत मांडणाऱ्या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना, कुणी, कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवलं होतं? सुरुवातही जनता करते आणि शेवटही जनताच करते. याचं विस्मरण बहुदा सत्तेच्या गुर्मीने झालेलं दिसतंय! बाकी नेहमीचीच 'बाप' वगैरेची भाषा तुम्हीचं करू शकता! जनतेने देखील तुमच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवलेली नाही!,असा टोला देखील प्रवीण दरेकर यांनी हाणला आहे.

(bjp leader pravin darekar replies shiv sena mp sanjay raut on search operation of ed in pratap sarnaik house)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा