Advertisement

विहंग सरनाईक यांना ईडीने घेतलं ताब्यात

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना अंमलबजावणी संचलनालया (ED)च्या पथकाने ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

विहंग सरनाईक यांना ईडीने घेतलं ताब्यात
SHARES

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना अंमलबजावणी संचलनालया (ED)च्या पथकाने ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात नेण्यात येणार असल्याचं समजत आहे. 

‘टाॅप्स सिक्युरिटी ग्रुप’ संदर्भात ही कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. यूकेहून आलेल्या रकमेचा हवालासारखा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश असल्याची शक्यता असल्याने ‘टॉप्स ग्रुप’चे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा- शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

ईडीने मंगळवारी सकाळी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील निवासस्थान आणि कार्यालय अशा जवळपास १० ठिकाणांवर छापे मारले. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, आणि विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं. चौकशीनंतर विहंग सरनाईक यांना ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट इथून ईडीने ताब्यात घेतलं. ईडीचे अधिकारी वसंत लॉन्स येथील सरनाईक यांच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेल्याचं कळत आहे. त्यानंतर विहंग सरनाईक यांना मुंबईतील ईडीच्या कार्यालयात देखील नेण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. 

दरम्यान हे छापे नसून, केवळ झाडाझडती असल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवल्यानेच प्रताप सरनाईक यांची कोंडी करण्यासाठी केंद्राच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

(ED officials detain shiv sena mla pratap sarnaiks son vihang sarnaik from their residence in thane)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा