Advertisement

"जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…"

जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार? असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

"जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…"
SHARES

दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा सल्ला देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार? असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. (bjp leader nilesh rane criticises sharad pawar on his maratha reservation comment)

पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं... पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

तर, मराठा आरक्षणा बाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाही, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

हेही वाचा - संभाजीराजे, उदयनराजेंनी भाजपकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा- शरद पवार

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या कोट्यातील जागेवरून राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा या दोघांनीही केंद्र सरकारच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता भासल्यास दोघांनीही त्या आंदोलनाचं नेतृत्व देखील करावं, असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.

संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत जोरकसपणे मांडत आहे. त्यासाठी आवश्यक लोकांच्या भेटीगाठी देखील ते घेत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत सर्व सरकारी भरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचंच आरक्षण रद्द करा. मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास खासदारकी सोडण्यास देखील तयार आहे, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement