Advertisement

सुशांत सिंह प्रकरण: सीबीआयने काय दिवे लावले?- शरद पवार

जवळपास दीड महिना होत आला तरी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या हाती ठोस पुरावे आलेले नाहीत. यासंदर्भात सीबीआयने नुकतंच एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे.

सुशांत सिंह प्रकरण: सीबीआयने काय दिवे लावले?- शरद पवार
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात सीबीआयने नुकतंच एक पत्रक जारी केलं आहे. त्यातील माहितीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (ncp chief sharad pawar raises questions on cbi inquiry of sushant singh rajput suicide case)

जवळपास दीड महिना होत आला तरी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या हाती ठोस पुरावे आलेले नाहीत. यासंदर्भात सीबीआयने नुकतंच एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,' असं या निवेदनात सीबीआयने नमूद केलं आहे. यावरून शरद पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आम्ही वाचलं होतं की एका कलाकाराने आत्महत्या केली. त्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र केंद्र सरकारचा त्यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांनी हा तपास वेगळ्या एजन्सीकडे दिला. या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला अजूनपर्यंत बघायला मिळालेला नाही. या प्रकरणात आत्महत्येचा विषय बाजूलाच राहिला असून लक्ष वळवण्यासाठी इतरच गोष्टींचा तपास सुरु आहे. यामुळे सत्य बाहेर येईल का हाच प्रश्न आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा- शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस, म्हणाले आमच्यावर विशेष प्रेम…

दरम्यान, एम्सने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्वाळा दिला की त्याच्या शरीरात कोणतंही विष आढळलं नाही. यातून भाजपाचे तोंड काळे झालं आहे. मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजपा आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआयने चौकशी करून शोधावे,अशी खरमरीत टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.

देशपातळीवर ढासळलेली अर्थव्यवस्था, कोरोना संकट, बेरोजगारी, शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न हाताळण्यात मोदी सरकारला जे अपयश आलं आहे, तिकडून लोकांना दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी, बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा फायदा मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरंच लोणी खाता यावं यासाठी रचलेलं हे षडयंत्र होतं, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

हेही वाचा- सुशांत सिंह प्रकरण: एम्सच्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं- काँग्रेस


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा