Advertisement

शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?, निलेश राणेंची खरमरीत टीका

शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची खरमरीत टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली आहे.

शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?, निलेश राणेंची खरमरीत टीका
SHARES

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेला (shiv sena) शेतीतलं काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची खरमरीत टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. 

‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केले. ते म्हणाले, शिवसेना हा प्रचंड गोंधळलेला पक्ष आहे. या पक्षाचा उतरता काळ सुरू झाल्याने त्यांची पतही घसरु लागली आहे. दिल्लीतही शिवसेनेला कुणी किंमत देत नाही. अलीकडच्या काळात कोणत्या एका भूमिकेवर शिवसेना ठाम राहिल्याचं दिसून आलेलं नाही. ते रोज खोटं बोलतात, एक दिवस महाराष्ट्राची जनताच त्यांची दखल घेणं बंद करेल आणि त्यानंतर शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- १० वर्षांपूर्वीचं नाही, आजचं काय ते बोला, फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर

कृषी कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणी शरद पवार यांनी १० वर्षांपूर्वी केली होती. तरीही आता शरद पवार या कायद्यांना का विरोध करत आहेत हे समजण्यापलिकडे आहे. केवळ पंजाबमध्येच कृषी कायद्यांना जोरदार विरोध होत असून इतर राज्यात मात्र तशी परिस्थिती नाही, असा दावा देखील निलेश राणे यांनी केला.

महाराष्ट्रात (maharashtra) देखील कृषी कायद्याचा जोरदार विरोध होत असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षाच्या पाठिंब्यावर उत्स्फूर्तपणे ‘भारत बंद’ पाळण्यात आला आहे. 

त्यावर बोलताना, सध्या कृषी कायद्यावर केवळ आणि केवळ राजकारण सुरू आहे. केंद्रातील सरकार हे सचिव नाही, तर मा. पंतप्रधान आणि केंद्रातील मंत्री चालवतात. महाराष्ट्रातील सरकारसारखी स्थिती केंद्रात नाही. जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी पक्षांची ही भूमिका. पण शेतकरी सुज्ञ आहेत. ते निश्चितपणे समजूतदारीची भूमिका घेतील. शिवसेना, द्रमुक, तृणमूल, डावे पक्ष या सर्वांनी सुद्धा त्यावेळी तीच भूमिका घेतली. आज सारे पक्ष वाहत्या गंगेत हात धुण्याच्या भूमिकेत. आज केवळ मोदीजी यांना विरोध करण्यासाठी सर्वांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे.

(bjp leader nilesh rane slams shiv sena on farm bill issue)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा