Advertisement

१० वर्षांपूर्वीचं नाही, आजचं काय ते बोला, फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर

विधानसभेतील विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीवर दुटप्पीपणाचा आरोप करत असताना १० वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि त्यावर बोला, असे खडेबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावले आहेत.

१० वर्षांपूर्वीचं नाही, आजचं काय ते बोला, फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) देखील कृषी कायद्याचा जोरदार विरोध होत असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षाच्या पाठिंब्यावर उत्स्फूर्तपणे ‘भारत बंद’ पाळण्यात आला. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीवर दुटप्पीपणाचा आरोप करत असताना १० वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि त्यावर बोला, असे खडेबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावले आहेत. 

‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, कुणालही जोरजबरदस्ती केलीली नसताना लोकं उत्स्फूर्तपणे भारत बंद मध्ये सामील झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी किंवा तृणमूल काँग्रेस यापैकी कुणीही लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलेलं नाही. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्याला कुठलंही राजकीय पाठबळ नाही. त्यांच्या हाती कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाही. त्यामुळे आपण मांडत असलेल्या भूमिकेचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दहावेळा विचार करायला हवा. कारण ते करत असलेल्या आरोपांवर उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांब जाईल. आज काय चाललंय ते बघायला हवं. दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका, असं संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- “माझी चूक झाली”, शरद पवार पत्रकार परिषद साेडून निघून गेले

सध्या कृषी कायद्यावर केवळ आणि केवळ राजकारण सुरू आहे. केंद्रातील सरकार हे सचिव नाही, तर मा. पंतप्रधान आणि केंद्रातील मंत्री चालवतात. महाराष्ट्रातील सरकारसारखी स्थिती केंद्रात नाही. जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी पक्षांची ही भूमिका. पण शेतकरी सुज्ञ आहेत. ते निश्चितपणे समजूतदारीची भूमिका घेतील. शिवसेना, द्रमुक, तृणमूल, डावे पक्ष या सर्वांनी सुद्धा त्यावेळी तीच भूमिका घेतली. आज सारे पक्ष वाहत्या गंगेत हात धुण्याच्या भूमिकेत. आज केवळ मोदीजी यांना विरोध करण्यासाठी सर्वांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला.

दरम्यान, मी कृषीमंत्री असताना कायद्यातील सुधारणांसंदर्भात राज्यांना पत्र लिहिलं होतं, यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण त्यात केंद्राने आणलेल्या तीन नव्या कृषी विधेयकाचा कुठेही उल्लेख नाही. ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. केवळ विषय भरकटवण्यासाठी हे उद्योग केले जात आहेत. त्यामुळे त्याला जास्त महत्व देऊ नका, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.  

(shiv sena mp sanjay raut slams opposition devendra fadnavis on farm bill issue)

हेही वाचा- शेतकऱ्यांच्या समर्थनात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा