Advertisement

आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी
SHARES

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात आरोपांच्या जाळ्यात पुरते अडकलेले माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिपमुळे संजय राठोड चांगलेच अडचणीत आले. आयता मुद्दा हाती लागल्याने संजय राठोड यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून होऊ लागली. जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप अधिवेशन चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे दबावात आलेल्या ठाकरे सरकारने अखेर त्यांचा राजीनामा घेतला.

त्यानंतर महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडकलेल्या धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून होऊ लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनीच ही मागणी उचलून धरली आहे. 

हेही वाचा- मुंबईतील ‘बत्ती गुल’ मागे चीनचा हात?, ऊर्जामंत्र्यांनीही व्यक्त केला संशय

संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांचा राजीनामा घेतला गेला यात आम्हाला पडायचे नसून राठोड आता मंत्रिपदावर नाहीत हे महत्त्वाचं आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी नि:ष्पक्षपणे व्हावी अशी आमची मागणी असून मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष ठेवावे, ही अपेक्षा आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसाच करुणा शर्मा आणि रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देत नसतील तर त्यांच्या पक्षाने त्याबाबत निर्णय घ्यावा. भाजपकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून माझंही तेच मत आहे. एवढंच नाही, तर राजकारणात वावरत असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल असल्यास त्यांची चौकशी करण्यासाठी वेगळी यंत्रणा असायला हवी, असं मतही पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी व्यक्त केलं.

त्याआधी एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

(bjp leader pankaja munde demands resignation of dhananjay munde)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा