Advertisement

शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?- प्रविण दरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. या भेटीत त्यांना कोविड संदर्भातील प्रोटोकाॅलचं पालन करता चक्क रुग्णांसोबत ‘झिंगाट’ गाण्यावर डान्सही केला.

शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?- प्रविण दरेकर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. या भेटीत त्यांना कोविड संदर्भातील प्रोटोकाॅलचं पालन करता चक्क रुग्णांसोबत ‘झिंगाट’ गाण्यावर डान्सही केला. यावर टीका करताना शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का? असा प्रश्न भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विचारला आहे.

नेमकं काय झालं?

आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट घातलेलं नव्हतं. तेथील रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स देखील केला. या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपकडून त्यावर टीका सुरू झाली. 

हेही वाचा- तौंते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार- उद्धव ठाकरे

कोविड प्रोटोकॉलचा भंग

रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार (sharad pawar) यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का? कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे,” असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं. 

जे चूक, ते चूकच

जे चूक, ते चूकच असते. मग तो कोणीही असो! दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोटे असतात, एवढंच 'रोहित' जी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तुम्ही, मतदारसंघातील सर्वांना कुटुंब समजून आपण त्यांची सेवा करता, हे उत्तमच! त्याविषयी आक्षेप किंवा शंका नाही. आपल्या चांगल्या कामाबद्दल कौतुकच आहे. पण, नियम हा सर्वांसाठी सारखाच असतो. मग तो तुमच्या पक्षाचा नेता असो वा अन्य कोणत्या! राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी रुग्णांची जमेल तशी सेवा करीत आहेतच. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणं, ही तुमच्या माझ्यासारख्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल, असं प्रविण दरेकर यांनी नोंदवलं.

(bjp leader pravin darekar criticised ncp mla rohit pawar on visit of covid 19 center without PPE kit)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा