Advertisement

तौंते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार- उद्धव ठाकरे

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौंते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठं नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

तौंते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार- उद्धव ठाकरे
SHARES

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौंते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठं नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केली आहे.

२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असं आश्वस्त केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

तौंते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला असून येथील फळबागा आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ मे रोजी कोकणचा दौरा केला. 

तौंते चक्रीवादळाने जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे पूर्ण होताच संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

हेही वाचा- गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत! मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही! निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-लॉकडाऊन आणि आता हे संकट! केवळ काही जिल्ह्यांचा प्रश्न असल्याने भरघोस मदत राज्य सरकारने करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली होती.

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस देखील आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यातच पुन्हा हे नुकसान झाल्याने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी कोळीबांधवांनी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस राज्य सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली, पण त्याची पूर्तता केली नाही. वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त झालेल्या असतानाही झाडामागे ५ ते १० रुपये लोकांना मिळाले होते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

(cyclone tauktae affected people will get compensation and financial aid like cyclone nisarga in maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा