Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!, प्रविण दरेकर संतापले

सुसाईट डेस्टिनेशन"ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय ! अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!, प्रविण दरेकर संतापले
SHARES

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार 'जबाबदार' आहे. सुसाईट डेस्टिनेशन"ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय ! अशा शब्दांत भाजप (bjp) आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. 

विरारमध्ये (virar) घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.भंडारा,भांडुप,नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. कोरोनापेक्षा "सरकारी मुर्दाडपणामुळे" अनेक निष्पापांना जीव गमवावा लागल्याचं प्रविण दरेकर म्हणाले.

हेही वाचा- होम डिलिव्हरी मिळेल?, टॅक्सी-रिक्षातून कोण करू शकतं प्रवास?, तुमच्या प्रश्नांची उत्तरं वाचा

खरंतर या घटनेवर काय प्रतिक्रिया द्यायची, हेच सध्या कळत नाहीय. आम्ही समजू शकतो की यंत्रणेवर मोठा ताण येतोय. व्यवस्थेत कमतरता आहे. परंतु विरारमध्ये घडलेली दुर्घटना ही व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळेच घडली आहे. कालची नाशिकची घटना हे ताज उदाहरण आहे. याआधी भंडाऱ्याला आग लागली होती, तशी ठाण्यातही लागली होती, एवढं सगळं झाल्यानंतर पण आम्ही जागे होणार नसू, तर सत्ताधारी म्हणून कशाला खुर्ची उबवताय. सरकारला जर जनाची नाही, तर मनाची लाज असेल, तर त्यांनी सत्तेतून तात्काळ पायउतार व्हावं, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.

किती बळी आणखी घेणार आहात? काल २५ बळी घेतले आज १३ बळी घेतले. व्यवस्थेतील दोष आणि निष्काळजीपणानेच हे बळी घेतले आहेत. मी धिक्कार करतो सरकारच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा. या घटनांना संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे. प्रत्येक मंत्र्यांने आपापल्या जिल्ह्यात पाहणी केली असती, व्यवस्था तपासल्या असल्या, पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं असतं, तरी या यंत्रणांमधील दोष दिसले असते. पण सरकार ढिम्म आहे. केवळ मीडियासमोर यायचं, केवळ केंद्र-राज्य असं राजकारण करायचं, एवढंच सरकारमधील मंत्री उद्योग करत असल्याचा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला. 

(bjp leader pravin darekar slams maha vikas aghadi government on virar hospital fire incident)

हेही वाचा- पालिकेविरोधात अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्याला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा