Advertisement

आमची बांधिलकी सिल्व्हर ओक, मातोश्री अशी येरझरा घालत नाही- राधाकृष्ण विखे

अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतंय? हे लपून राहिलेलं नाही, अशा शब्दांत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

आमची बांधिलकी सिल्व्हर ओक, मातोश्री अशी येरझरा घालत नाही- राधाकृष्ण विखे
SHARES

आमची बांधिलकी कधि सिल्व्हर ओक, कधी मातोश्री अशी येरझरा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा (bjp leader radhakrishna vikhe patil criticises shiv sena mp sanjay raut through open letter) कोण करतंय? हे लपून राहिलेलं नाही, अशा शब्दांत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. 

महाराष्ट्राचं ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकलं जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय!, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातून विखे पाटील यांच्यावर टीका केली होती.

या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी खुल्या पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. ते आपल्या पत्रात लिहिलात की, बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्या सारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले काय? असा प्रश्न विखे यांनी राऊतांना केला आहे. 

हेही वाचा - “संजय राऊत या शैक्षणिक जगबुडीपासून तुम्हीच वाचवा”- आशिष शेलार

ते पुढं म्हणतात, आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो, त्याचं निष्ठेने काम केलं. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळे तुम्हाला फारसं गांभीर्याने घ्यायचं नसतं हे लोकांना आता कळू लागलं आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटी उडीचं डोंबारी राजकारण तुम्ही किती सहजरित्या करता हे महाराष्ट्राने अलिकडेच बघितलं आहे. 

मी भाजपमध्ये आनंदी आहे. पण महाविकास आघाडीचे शिल्पकार या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावाला मंत्रिपद मिळवून देता न आल्याचं दु:ख असेलच आणि त्यातून आलेली कमालिची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल. तर त्यात माझा काय दोष? थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण आपल्या अग्रलेखात केलेला आहे. रात्रीच्या अंधारात कमळ हाती घेण्यासाठी कोण, कुठे, केव्हा, कशी चाचपणी केली होती हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती, तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचं नाही. मातोश्रीविरूद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथवणी होती आणि कुणी वेळेवर यू-टर्न घेतला हा इतिहास अनेकांना माहिती आहेच, मी का सांगावा? अशा शब्दांत विखेंनी राऊत यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - तर, ठाकरे सरकारला पाठिंबा, भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा