Advertisement

'इफ्तार'ला विरोध करणाऱ्यांची सीआयडी चौकशी करा- पुरोहित

राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला विरोध करणाऱ्या लोकांची थेट सीआयडी चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते राज पुरोहित यांनी सोमवारी केली.

'इफ्तार'ला विरोध करणाऱ्यांची सीआयडी चौकशी करा- पुरोहित
SHARES

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचने सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने वाद उफाळून आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या लोकांची थेट सीआयडी चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते राज पुरोहित यांनी सोमवारी केली. भाजपा कार्यालय इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.


राष्ट्रभावनेच्या विरोधात भूमिका?

धार्मिक सद्भावना डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री अतिथीगृह इथं मुस्लिम मंचने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला विरोध करणारे कोण आहेत? त्याची माहिती सरकारने घ्यावी. कारण राष्ट्र भावनेच्या विरोधात ते भूमिका घेत असल्याने त्यांची सीआयडी चौकशी करण्यात, यावी असं पुरोहित यांनी सांगितलं.


कुठली शक्ती कार्यरत?

गेल्या २२ वर्षांपासून भाजप हज हाउस इथे इफ्तार पार्टीचं आयोजन करत आहे. या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्तिथ राहत आहेत. भाजपाने नेहमीच राष्ट्रभक्ती दाखवलेली आहे. या राष्ट्रभक्तीच्या विरोधात कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही पुरोहित म्हणाले.


राज्यपालांना पत्र

सहयाद्री अतिथीगृहात सोमवारी संध्याकाळी या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीला मुस्लिम समुदायातील उद्योगपती, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर असे एकंदर ३०० जण सहभागी होणार आहेत. मात्र सरकारी अतिथीगृहात खाजगी संस्थेचा इफ्तार आयोजित केला जाऊ शकत नाही, असं काही मुस्लिम कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. याबाबत या कार्यकर्त्यांनी राज्याच्या राजशिष्टाचार संदर्भातल्या परिपत्रकाराचा हवाला देऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पत्र देखील लिहलं आहे.हेही वाचा-

म्हणून तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या- शरद पवारRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा