Advertisement

“तर शिवसेना मुस्लिमांचाही मेळावा घेईल”

शिवसेना लवकरच गुजराती मतदारांचा मेळावा घेणार आहे. यावर टीका करताना शिवसेना भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेईल, असा टोमणा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मारला आहे.

“तर शिवसेना मुस्लिमांचाही मेळावा घेईल”
SHARES

मुंबई महापालिकेतील (bmc) शिवसेनेच्या ताब्यात असलेली सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजप रणनिती आखत असताना शिवसेनेनेही परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी डाव रचला आहे. त्यानुसार शिवसेना लवकरच गुजराती मतदारांचा मेळावा घेणार आहे. यावर टीका करताना शिवसेना भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेईल, असा टोमणा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मारला आहे. 

शिवसेनेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका अनेकवेळा समोर आलेली आहे. शिवसेना सोयीनुसार आपली भूमिका बदलत असते. गरज असेल तर शिवसेना भविष्यात मुस्लिम सामाजाचा देखील मेळावा घेऊ शकते. कारण सत्तेसाठी त्यांनी आधीच युतीधर्म मोडून समविचारी नसलेल्या पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केलं आहे. असं रावसाहेब दानवे (raosaheb danve) म्हणाले.

शिवसेना लवकरच गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' (uddhav thackeray) अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. 

हेही वाचा- अजानमध्ये गोडवा! शिवसेनेकडून चक्क अजान स्पर्धेचं आयोजन

येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल १०० गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भाजपच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे (shiv sena) दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील मुलांसाठी आजान पठण स्पर्धा आयोजित केली होती. त्यावरून भाजपने शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं होतं. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व असून प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यामुळे अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं होतं.

(bjp leader raosaheb danve criticised shiv sena over gujrati voter rally)

हेही वाचा- 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेचं गुजराती मतदारांकडे लक्ष

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा