Advertisement

अजानमध्ये गोडवा! शिवसेनेकडून चक्क अजान स्पर्धेचं आयोजन

मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा नुकतीच शिवसेनेने केली आहे. त्यावर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

अजानमध्ये गोडवा! शिवसेनेकडून चक्क अजान स्पर्धेचं आयोजन
SHARES

मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा नुकतीच शिवसेनेने (shiv sena) केली आहे. त्यावर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील मुलांसाठी आजान पठण स्पर्धा आयोजित केली आहे. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व असून प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यामुळे अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा- योगी आदित्यनाथ मुंबईत येणार, उद्योगपती, सेलिब्रिटींना भेटणार

यासंदर्भात एका आॅनलाईन मुलाखतीत पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं की, अजान एका धर्माची भावना आहे. अजान ऐकून मुस्लिम बांधव आपल्या दिवसाची, कामाधंद्याची सुरूवात करतात. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे ती सतत ऐकावीशी वाटते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहत असल्याने माझ्या कानावर तर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. अजानचं महत्त्व महाआरतीप्रमाणेच आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं योग्य नाही, असंही पांडुरंग सकपाळ म्हणाले. 

अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिलं जाईल. परीक्षक म्हणून मौलानांची नियुक्ती केली जाईल. या स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे ,असं अजान स्पर्धेविषयी माहिती देताना पांडरंग सकपाळ यांनी स्पष्ट केलं.

(shiv sena south mumbai head pandurang sakpal organizing azan competition)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा