Advertisement

तुम्ही दगडावर कितीही डोकं आपलंट तरी.., मुनगंटीवारांचं अजित पवारांना आव्हान

तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे, असं सुधीर मुनगंटीवार अजित पवार यांना उद्देशून म्हणाले.

तुम्ही दगडावर कितीही डोकं आपलंट तरी.., मुनगंटीवारांचं अजित पवारांना आव्हान
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा अधूनमधून केला जात आहे. असा दावा नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीसुद्धा नुकताच केला होता. या दाव्यांना खोडून काढताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी थेट अजित पवार यांना आव्हानच दिलं आहे.

तीन पक्षाचं सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार ६ महिन्यात जाईल, असं भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपाला नाकारलं. पुढच्या ४ महिन्यांत आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मंगळवारी विधानसभेत केला होता. भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं देखील अजित पवार म्हणाले होते. 

हेही वाचा- निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

तर, हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत, अनेकांना उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल असून अनेक सदस्य चर्चाही करत आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केलं होतं. यानंतर भाजपमधील नाराज आमदारांवर पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या.

त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे (bjp) २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. २० तर सोडाच १२ महिन्यात तुम्ही भाजपाचा एकही आमदार फोडू शकलेला नाहीत. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे. तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही, असं थेट आव्हानच मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना दिलं. 

(bjp leader sudhir mungantiwar challenges maharashtra deputy cm ajit pawar)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा