Advertisement

निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावी लागेल. निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.

निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर
SHARES

मेट्रो कारशेड प्रकल्पाचं काम कांजूरमार्गच्या जागेत हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने केवळ अहंकारातून घेतल्याची टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून होत असताना संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावी लागेल. निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? असा प्रश्न देखील संजय राऊत (sanjay raut) यांनी विचारला आहे.

कुठलीही विकासकामे ही आपण लोकांच्या हितासाठी करतो. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी ठाकरे सरकारने हट्ट सोडून पुढाकार घेतला पाहिजे. कारण मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा म्हणजे सर्वांचाच आहे. सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम होत आहे. तेव्हा ही आडमुठी भूमिका सोडून आरेमध्ये तात्काळ कारशेड उभारण्याचं काम सुरू व्हावं, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले होते.

हेही वाचा- हे मीठागरवाले कुठून आले? संजय राऊत संतापले

तर, आरेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत. त्यानंतर कांजूरमार्ग (kanjurmarg) मेट्रो कारशेड बाबत  स्वतःच नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मान्य नाही. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य करणार का? स्वतःच्या अहंकारातून अजून मुंबईकरांचे किती नुकसान करणार? अहंकार! अहंकार आणि अहंकार!!, असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं.

त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी, अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावी लागेल. आरेचं जंगल, प्राणी, निसर्ग वाचवणं यामध्ये कोणता अहंकार आहे?. हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. नद्या, वाघ, जंगल वाचवा हा तर मोदी सरकारचा कार्यक्रम आहे, असं मत व्यक्त केलं. 

तसंच महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुख: मी समजू शकतो. विकास प्रकल्पांना विरोध करुन लोकांमध्ये रोष निर्माण करायचा. लोकांच्या अडचणीत वाढ करायची. सरकारला बदनाम करायचं. यामुळे केवळ महाराष्ट्राचं नुकसान होत असून जनतेवर आर्थिक भार पडत आहे. अशाप्रकारे केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणांना हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही. ही लढाई चालूच राहील, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी विरोधकांना दिलं. 

(shiv sena mp sanjay raut replies devendra fadnavis over bombay high court stay on mumbai metro car shed at kanjurmarg)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा