Advertisement

आता तरी आरेत कारशेडचं काम सुरू करा, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

न्यायालयाच्या आदेशानंतर तरी मुंबईकरांच्या सोईसाठी आरेमध्ये तात्काळ कारशेड उभारणीच्या कामाला सुरूवात करावी, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला.

आता तरी आरेत कारशेडचं काम सुरू करा, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
SHARES

मेट्रो कारशेडच्या कामाला जेवढा उशीर होईल, तेवढा या प्रकल्पाचा खर्च वाढत जाईल. शिवाय मेट्रो प्रकल्पाचं काम देखील पुढं ढकललं जाईल. आतापर्यंत झालं तेवढं नुकसान खूप झालं. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर तरी मुंबईकरांच्या सोईसाठी आरेमध्ये तात्काळ कारशेड उभारणीच्या कामाला सुरूवात करावी, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिला.

न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, मेट्रो कारशेड (mumbai metro) प्रकल्पाबाबत राज्य सरकार जेवढा उशीर करेल, तेवढी या प्रकल्पाची किंमत वाढेल. सद्यस्थितीत कारशेडचं काम बंद असल्याने दिवसाला सगळे खर्च मिळून राज्य सरकारचं ५ कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. आधीच हे काम वर्षभर रखडल्याने आतापर्यंत किती रुपयांचं नुकसान झालं असेल त्याचा अंदाज करा. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम आणखी रखडलं तर किती नुकसान होईल, हे देखील लक्षात घ्या.

हेही वाचा- कारशेडच्या कामातून आम्ही ‘इतके’ पैसे वाचवतोय, आदित्य ठाकरेंनी स्थगितीनंतर दिली प्रतिक्रिया

कुठलीही विकासकामे ही आपण लोकांच्या हितासाठी करतो. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी ठाकरे सरकारने हट्ट सोडून पुढाकार घेतला पाहिजे. कारण मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा म्हणजे सर्वांचाच आहे. सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम होत आहे. तेव्हा ही आडमुठी भूमिका सोडून आरेमध्ये तात्काळ कारशेड उभारण्याचं काम सुरू व्हावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

आदित्य ठाकरे यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी याआधी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल वाचावा, त्यावर अभ्यास करून काम करावं. ते पहिल्यांदाच मंत्रिपदावर असल्याने त्यांनी जनतेसाठी काम करावं, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दणका देत कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणावर स्थगिती आणली आहे.  मुंबई मेट्रो-३ चं कारशेड आरेतून कांजूरमार्ग (kanjurmarg) येथील जागेवर हलवण्याचा मोठा निर्णय काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. परंतु न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता या निर्णयावर आणि मुख्यत्वेकरून मेट्रो कारशेडच्या कामावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

(opposition leader devendra fadnavis demands to start metro 3 car shed project work in aarey)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा