Advertisement

पंकजा मुंडे, विनोद तावडेंची नाराजी दूर, दोघांचीही राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती

महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिवपदी नेमून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसत आहे.

पंकजा मुंडे, विनोद तावडेंची नाराजी दूर, दोघांचीही राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती
SHARES

भारतीय जनता पक्षानं शनिवार  २६ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या कार्यकारिणीत अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देतानाच पक्षातील काही नाराज नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिवपदी नेमून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसत आहे. याचसोबत सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचीही राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. 

राष्ट्रीय उपाध्यक्ष

राधा मोहन सिंह, मुकूल राय, रेखा वर्मा, अन्नपूर्ण देवी, भारती भेन शियाल, डी के अरुणा, एम चूबा आव, अब्दुल्ला कुट्टी यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा- आता भाजप-संघासाठी काम करणार, ‘त्या’ माजी नौदल अधिकाऱ्याचा इरादा

पक्षाचे महासचिव

दुष्यंत कुमार गौतम, डी पुरेंदश्वरी, सीटी रवि आणि तरुण चुग यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

५ राष्ट्रीय प्रवक्ते, २३ प्रवक्ते

पक्षाेनअनिल बलूनी, संजय मयूख, डॉ. संबित पात्रा, सुधांशु त्रिवेदी आणि शाहनवाझ हुसैन यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय २३ जणांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या प्रवक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील खासदार हिना गावित यांच्यासह राजीव चंद्रशेखर, संजू वर्मा, इकबाल सिंह लालपुरा, राज्यवर्धन सिंह राठौड, अपराजिता सारंगी गुरुप्रकाश, एम किकोन, नुपुर शर्मा, राजू बिष्ट आणि के के शर्मा यांचा समावेश आहे.

नव्या कार्यकारिणीत अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कर्नाटक खासदार तेजस्वी सूर्या यांची युवा मोर्चा प्रमुखपदी, तेलंगणाच्या के लक्ष्मण यांना ओबीसी मोर्चाच्या प्रमुखपदी, मध्य प्रदेशच्या लाल सिंह आर्य यांना एससी मोर्चा प्रमुखपदी तसंच झारखंडचे खासदार समीर ओरा यांची एसटी मोर्चाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा