कार्यकर्त्यांची मागणी शत-प्रतिशत भाजपाची

 Pali Hill
कार्यकर्त्यांची मागणी शत-प्रतिशत भाजपाची
कार्यकर्त्यांची मागणी शत-प्रतिशत भाजपाची
See all

मुंबई - एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युतीसाठी बोलणी, तर दुसऱ्या बाजूला राज्यात शत-प्रतिशत भाजपाची इच्छा... ठाण्यात सुरू असलेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीत हे चित्र दिसलं. या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी शत प्रतिशत भाजपाची मागणी पुन्हा लावून धरली.

'अर्धी सत्ता नको'

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत मिळालेल्या यशांनतर भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत भाजपाचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते मधु चव्हाण यांनी अर्धी सत्ता नको, सत्तेत वाटेकरी नको अशी भूमिका मांडली. सत्तेत वाटेकरी नको असं विधान एका नेत्याकडून होताना दुसरीकडे मात्र मुंबई महानगरपालिकेत युतीसाठी भाजपाकडून आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे शिवसेनेशी चर्चा करणार आहेत.

Loading Comments