Advertisement

“तर लोकं आमदार, खासदारांच्या घरात घुसतील..”

आम्ही हे इंजेक्शन घरात पिणार होतो का? लोकांनाच देणार होतो, मग हा अट्टाहास कशासाठी? जर सरकारनेच इंजेक्शन खरेदी करायचं होतं, तर त्यांनी कंपनीला अॅडव्हांस द्यावा.

“तर लोकं आमदार, खासदारांच्या घरात घुसतील..”
SHARES

उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या घरात घुसले तर, आपल्याला आश्चर्य वाटायला नको. इतके लोक असहाय्य झालेत, वणवण भटकत आहेत आणि सरकार काहीच करत नाहीय, अशा शब्दांत महाराष्ट्रात रेडमेडसिवीर इंजेक्शन आणि आॅक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजप्रचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, सत्ता गेली चुलीत. आता सर्व सामान्य माणूस लोकप्रतिनिधींना घरामध्ये बसू देणार नाही. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या घरात घुसले तर, आपल्याला आश्चर्य वाटायला नको. इतके लोक असहाय्य झालेत, वणवण भटकत आहेत आणि सरकार काहीच करत नाही. 

जर सरकारने सिस्टिम लावली आहे की महाराष्ट्र सरकारच रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करेल, तर रोज ५ लाख इंजेक्शन खरेदी करून ते जिल्हाधिकाऱ्यांना द्यावीत. जुन्या संबंधांचा दाखला देत ४ जिल्ह्याधिकाऱ्यांनी मला फोन करून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मग तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करताहेत? भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devandra fadnavis), नितीन गडकरी आम्ही सर्व मिळून ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड्स, आॅक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देत आहोत, असं तुम्ही करणार नाहीत, बाहेर पडणार नाहीत आणि केवळ भाजपवर आरोप करणार.

हेही वाचा- नवाब मलिकांविरोधात भाजप आक्रमक, दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल

काल नवीनच विषय सुरू केला की रेमडेसिवीर बनवणाऱ्या १६ कंपन्यांना केंद्राने म्हणे आदेश देऊन महाराष्ट्राला इंजेक्शन द्यायचं नाही, असं सांगितलं. गुजरातच्या एफडीएने तिथल्या कंपन्यांना दिलेलं पत्र पुरावा म्हणून दाखवलं. तसं पत्र तर महाराष्ट्राच्या एफडीएने इथल्या कंपन्यांना दिलं आहे. आरोप सिद्ध करू न शकल्याने ते खोटे पडले. 

वापीतून ज्या कंपनीतून इंजेक्शन आणायचं आहे ती कंपनी अॅडव्हांस मागत असल्याने आणि अॅडव्हांस देण्याची सरकारची पद्धत नसल्याने व्यवहार खोळंबला होता. तेव्हा प्रविण दरेकर यांनी या कंपनीला भाजपकडून अॅडव्हांस देऊन सुरूवातीला ७ हजार इंजेक्शन घेता येतील का अशी विचारणा डाॅ. राजेंद्र शिंगणे यांना केली होती. त्यांच्या होकारानंतर आणि परवानग्या मिळाल्यानंतर हे इंजेक्शन विकत घेण्याची तयारी सुरू झाली. त्याचेच पुढं ५० हजार इंजेक्शन मिळणार होते.

आम्ही हे इंजेक्शन घरात पिणार होतो का? लोकांनाच देणार होतो, मग हा अट्टाहास कशासाठी? जर सरकारनेच इंजेक्शन खरेदी करायचं होतं, तर त्यांनी कंपनीला अॅडव्हांस द्यावा. त्यानंतर या कंपनीच्या मालकाला चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं, मग दमबाजी केली. आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर बिनधास्त करा, असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांनी दिलं.

(bjp maharashtra president chandrakant patil clarifies on remdesivir injection purchase)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा