चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीला

 Bandra
चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीला

वांद्रे - महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजपात युती होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत कोणाचा महापौर बसणार यावरूनही दोन्ही पक्षात तणाव आहे. पण या परिस्थितीतही भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी काही कमी झाल्या नाहीत. बुधवारी भाजपाचे नेते आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. युती संदर्भातच चर्चा करायला ते मातोश्रीवर गेले असतील असा समज तुमचा झाला असेल. पण तसे नाही. बावनकुळे मातोश्रीवर गेले होते ते आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन.

Loading Comments