Advertisement

मुंबईला बंद करून आपले दुकानं चालवले : आशिष शेलार

सत्ताधारी पक्षांनी बंदचं आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपानं सरकारवर टीका सुरू केली आहे.

मुंबईला बंद करून आपले दुकानं चालवले : आशिष शेलार
SHARES

सत्ताधारी पक्षांनी बंदचं आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपानं सरकारवर टीका सुरू केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या या बंदचा निषेध करत ज्यांनी मुंबईला बंद करून आपले दुकान चालवले त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा, असं म्हटलंय.

राज्य सरकारवर निशाणा साधत शेलार म्हणाले, की “यांनीच मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केलं. युनियनच्या नावानं कारखानं बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले,” असा आरोप त्यांनी केला

एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरले आहे. आधी कोस्टल रोडला विरोध, नंतर नवी मुंबई आणि चिपी विमानतळाला विरोध त्यानंतर समृद्धी महामार्गला यांनी विरोध केलाय. हे सरकार मेट्रोचेही विरोधकच आहेत,” असं त्यांनी म्हटलंय.

हे सरकार मेट्रोचेही विरोधक असून ते राज्याच्या विकासाचे गतीरोधक आहेत. बंद आणि विरोध हाच यांचा धंदा असून त्यावरच त्यांचा चंदा गोळा होतो. या सरकारनं आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद केलाय, ही या तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी” चाल आहे. आई दुर्गामाते तू राज्यातील जनतेला या महिषासुरांचा खेळ उधळून टाकण्याचं बळ दे, असं म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपावर टिका केली आहे. बंद मोडून काढण्याची भाषण करणारे मूर्ख आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

“शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे.

लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत.

शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे

दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.



हेही वाचा

रिक्षा, टॅक्सी चालकांची मनमानी, आकारलं जातंय दुप्पट भाडं

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध">Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा