Advertisement

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?

शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला ईस्ट इंडिया कंपनीची उपमा दिली आहे.

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?
SHARES

शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आलेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भाजप नेत्यांकडून जोरदार पाठिंबा देण्यात येत आहे. शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला ईस्ट इंडिया कंपनीची उपमा दिली आहे. (bjp mla ashish shelar criticised maha vikas aghadi government over shiv sainik beaten up ex navy officer in kandivali)

मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुद्धी गहाण ठेवली काय? हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यानं शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. त्यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणी एकूण ६ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची शनिवारी जामिनावर सुटका झाली. परंतु रात्री उशिरा या सगळ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - आता भाजप-संघासाठी काम करणार, ‘त्या’ माजी नौदल अधिकाऱ्याचा इरादा

 शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनाक्रमाबाबत निवेदन देण्यासाठी मदन शर्मा यांनी निवृत्त जवानांच्या शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी राजभवन इथं भेट घेतली. यावेळी शर्मा यांनी यापुढे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असल्याचं सांगत राज्यात गुंडगिरी खपवून घेणार नाही, असं म्हटलं. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही राज्यपालांकडे केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. 

मदन शर्मा यांच्या मारहाणीचा मुद्दा भाजपने चांगलाच उचलून धरला आहे. शर्मा यांना मारहाण होताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सअॅपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. असं ट्विट केलं होतं.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा