Advertisement

मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा??

राज्यातील ठाकरे सरकारला मात्र त्याचं कुठलंही गांभीर्य नाही. सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा असल्याचा टोला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा??
SHARES

मुंबईत मागील २४ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबलं. रस्ते जलमय झाले, रेल्वेसहीत इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडल्या. तसंच लोकांच्या घराघरांत-दुकानांमध्ये पाणी शिरून मालमत्तेचं अतोनात नुकसान झालं आहे. परंतु राज्यातील ठाकरे सरकारला मात्र त्याचं कुठलंही गांभीर्य नाही. सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा असल्याचा टोला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. (bjp mla ashish shelar criticised thackeray government over flood in mumbai)

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचं अतोनात नुकसान केलं. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिलं, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे! असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. 

हेही वाचा - मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक रस्ते, स्टेशन जलमय

मुंबईत मंगळवारपासून तब्बल २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सप्टेंबर महिन्यात २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबईत एवढा पाऊस पडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एका दिवसात मुंबईत इतका पाऊस पडला. त्याचबरोबर १९७४- २०२० दरम्यान सप्टेंबर महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस बुधवार सकाळपर्यंत सुरुच होता. 

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. दरम्यान बुधवारीही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा