Advertisement

शिवसेना काँग्रेसविरोधात आंदोलन करणार का? आशिष शेलारांचा सवाल

पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना काँग्रेसविरोधात आंदोलन करणार का? आशिष शेलारांचा सवाल
SHARES

कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो!  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे! पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. (bjp mla ashish shelar criticises shiv sena over shivaji maharaj statue removed in karnataka)

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मनगुत्ती गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याच्या घटनेवरून शिवसेना आणि काँग्रेसला एकत्रितरित्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आशिष शेलार यांनी केला. ते म्हणाले, कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणं याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान देशामध्ये, अखंड हिंदुस्थानमध्ये कधीही कोण करताच कामा नये, तो होऊ आम्ही देणारही नाही. या सगळ्या घटनाक्रमाच्या मागे स्थानिक काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका या पुतळ्याला हटवण्याची आहे. काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या या जारकीहोळी यांच्या विरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? सवाल आमचा तुम्हाला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा- घरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना?- आशिष शेलार

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आंदोलन करावं, लागलं तर शिवसेनेला परवानगीची गरजच काय? शिवसेनेला विरोधी पक्षनेता आणि भाजपच्या परवानगीची गरज का लागते? या प्रश्नाचं उत्तरही तुम्हालाच द्यावं लागेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने जसं तहसीलदार आणि पोलीस पाटलांनी सांगितलं, त्यापद्धतीनेच झाला पाहिजे. कर्नाटक सरकारला आमची विनंती आहे. शिवसेनेने आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर द्यावं, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.

हेही वाचा- परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं- आशिष शेलार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा