Advertisement

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत! पण जे नुकसान मुंबईरांचं झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही.

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती, सत्ताधारी, कंत्राटदारांना पळ काढता येणार नाही…
SHARES

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत! पण जे नुकसान मुंबईरांचं झालं त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

याबाबत अधिक बोलताना आशिष शेलार म्हणाले, तौंते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे पाणी तुंबणे, झाडे उन्मळून पडण्यासह मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती आणि महापालिका करित असलेले मदत कार्य याबाबत महापालिकेत जाऊन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा केली व माहिती घेतली. 

हेही वाचा- Cyclone Tauktae: तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

त्याशिवाय मुंबई (mumbai) शहरात रस्त्यावरून पाहणी केली असता, मरीन लाइन्सच्या ट्रायडंट हाॅटेलपासून विक्रोळी, भांडुपच्या रेल्वे स्टेशननजीक, ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात झाडं, फांद्या पडली आहेत. यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. झोपडपट्टीतील घरांची छतं उडून गेली आहेत. वरळी, माहीम, तुलसी पाईप रोड, जुहू तारा रोड, खार रोड, जय भारत सोसायटी, लिंकिंग रोड, भायखळ्यापर्यंत जागोजागी पाणी तुंबलं आहे. 

मुंबई महापालिका (bmc), पोलीस अधिकारी-कर्मचारी जागोजागी तैनात आहेत. परंतु पावसाळ्याआधीच मान्सूनपूर्व केलेल्या कामाचा बोजवारा यामुळे उघड झाला आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मुंबई तुंबलेली दिसत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदार आणि महापालिकेतील सत्ताधारी यांना पळवाट काढता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाचं तौंते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. सध्या हे वादळ मुंबई किनारपट्टीच्या पश्चिमेला १२० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

हे चक्रीवादळ सोमवारी रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल अशी शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यांचा वेग येत्या ४८ तासात मंदावेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

(bjp mla ashish shelar meets mumbai bmc commissioner iqbal singh chahal on cyclone tauktae situation )

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा