Advertisement

महापालिकेची तिजोरी कोण कुरतडतंय?, आशिष शेलारांचा संतप्त सवाल

राजावाडी रुग्णालयातील घटना अतिशय दुर्देवी असून महापालिकेच्या आरोग्याचं बजेट कोण खात आहे? असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेची तिजोरी कोण कुरतडतंय?, आशिष शेलारांचा संतप्त सवाल
SHARES

मुंबईच्या घाटकोपरमधील राजावाडा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यावर ही घटना अतिशय दुर्देवी असून महापालिकेच्या आरोग्याचं बजेट कोण खात आहे? असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

सायन रुग्णालयात मृतदेहा शेजारी मुंबईकरांना उपचार घ्यावे लागतात आणि राजावाडीत आयसीयूमध्ये रुग्णांचे डोळे उंदीर कुरतडतात. मग ८० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेचं १ हजार २०६ कोटींचं आरोग्याचं बजेट कोण खातं?कोण तिजोरी कुरतडतंय? ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार (ashish shelar) यांनी दिली.

हेही वाचा- राजावाडी रुग्णालयातील रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला, महापौर म्हणाल्या....

नेमकं काय झालं?

मुंबई महापालिकेच्या (bmc) राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात  दोन दिवसांपूर्वीच एका रुग्णाला दम लागत असल्याने दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी हा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. श्रीनिवास यल्लपा असं या २४ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. तपासणीत रुग्णाला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचं समोर आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. डोळे तपासले असता डोळ्याला उंदरानं कुरतडल्यासारखं दिसून आलं.  

याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितलं असता त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला असावा अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

गंभीर घटना

आयसीयू वॉर्ड असल्यानं तळ मजल्यावरच असायला हवा कारण रुग्णाला नेण्यासाठी बरं पडतं. इतकी खबरदारी घेतली असतानाही उंदीर आतमध्ये जातात. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

(bjp mla ashish shelar slams bmc on rajawadi hospital careless incident)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा