Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

‘हे’ तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!!- भाजप

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून सरकार वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी करत असल्याची माहिती बाहेर आल्याने भाजपने सरकारवरील हल्ला आणखी तीव्र केला आहे.

‘हे’ तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!!- भाजप
SHARES

मेट्रो कारशेडसाठी ( mumbai metro car shed) राज्य सरकारने निश्चित केलेल्या कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणावर स्थगिती आणतानाच कारशेडचं सुरू असलेलं काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. त्यातच मेट्रो ३ च्या कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून सरकार वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी करत असल्याची माहिती बाहेर आल्याने भाजपने सरकारवरील हल्ला आणखी तीव्र केला आहे. ‘हे’ तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!! असल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. 

याबाबत प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले, (ashish shelar) मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे, तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर.. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव आखला जातोय.

हेही वाचा- निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक आहेत. मेट्रो कारशेड बीकेसीत प्रस्तावित करणे “शिवसेनेचा (shiv sena) हा रडिचा डाव आहे”,तो मुंबईच्या “विकासाच्या नरडीचा घाव घेणारा ठरेल, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

तर, अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावी लागेल. आरेचं जंगल, प्राणी, निसर्ग वाचवणं यामध्ये कोणता अहंकार आहे?. हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. नद्या, वाघ, जंगल वाचवा हा तर मोदी सरकारचा कार्यक्रम आहे.

महाराष्ट्रात सरकार भाजपाचं नसल्याने अशा प्रकारचे निर्णय येत आहेत का अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे. महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुख: मी समजू शकतो. विकास प्रकल्पांना विरोध करुन लोकांमध्ये रोष निर्माण करायचा. लोकांच्या अडचणीत वाढ करायची. सरकारला बदनाम करायचं. यामुळे केवळ महाराष्ट्राचं नुकसान होत असून जनतेवर आर्थिक भार पडत आहे. अशाप्रकारे केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणांना हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही. ही लढाई चालूच राहील, असं आव्हान संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधकांना दिलं होतं. 

(bjp mla ashish shelar slams shiv sena over mumbai metro car shed and bullet train land in bkc)

हेही वाचा- हे मीठागरवाले कुठून आले? संजय राऊत संतापले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा