Advertisement

ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज

वीज बिल प्रकरणी लोकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज असल्याचा संताप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज
SHARES

वीज बिल प्रकरणी लोकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज असल्याचा संताप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.

(bjp mla atul bhatkhalkar criticised thackeray government for not giving any relief on electricity bill)

दोन दिवसांपूर्वीच महावितरणनं वीज बिल वसुलीचे आदेश काढले होते. त्याबाबत बोलताना, राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा- "वीज ग्राहकांना वाढीव बिलातून दिलासा नाहीच"

त्यावर प्रतिक्रिया देताना अतुल भातखळकर म्हणाले, वाढीव वीज बिलात ग्राहकांना कुठलीही सवलत मिळणार नाही आणि वीज बिल भरले नसल्यास तात्काळ वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. हा केवळ बेशरमपणा नसून खोटारडेपणाचा कळस आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या सरकारला जाग आली. आता या बेशरम आणि खोटारड्या सरकारला हजार व्हाॅल्टचे शाॅक देण्याची गरज आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले. 

भाजपने आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देण्याचं नाटक या सरकारने केलं. पण अखेर या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप आता आंदोलन करेल आणि सरकारला वीज बिलात सवलत द्यायला भाग पाडेल, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारनं यात मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही, असं स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी दिलं होतं. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा